आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; `रामशेज` चित्रपटाची घोषणा
Ramshej Movie Announcement: `रामशेज` या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील वर्षे हे मराठी ऐतिहासिक चित्रपटांचे होते. अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
Ramshej Movie: सध्या ऐतिहासिक चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. त्यातून प्रेक्षकही या चित्रपटांना तूफान प्रतिसाद देताना दिसत आहे. मागील वर्ष हे ऐतिहासिक चित्रपटांचे होते. 'सरसेनापती हंबीरराव', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला होता. आता 'रामशेज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या ऐतिहासिक चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळते आहे त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 'पावनखिंड' या गाजलेल्या चित्रपटातील अभिनेता अंकित मोहन यानं इन्टाग्रामवरून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.
त्यानं पोस्ट केलेल्या या पोस्टरखाली चाहत्यांच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून महाराजांच्या चरणी अर्पण करत आहोत आलमंड्स क्रिएशन्सची भव्यदिव्य अशी आगामी कलाकृती 'रामशेज'...'' पोस्टरमध्ये प्रभु श्री रामाचा फोटो दिसतो आहे आणि त्यांच्यापाठी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचा फोटो आहे, सोबत किल्लाही दिसतो आहे. 'पावनखिंड', 'मुरारबाजी', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांच्या निर्मात्यांची ही नवी पेशकश आहे. या चित्रपटाची निर्मिती ही निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भुषण आरेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - अभिनयासाठी शिक्षण सोडलं, पण आता बॉलिवूडमधूनही बाहेर... सलमानच्या हिरोईनसोबत असं काय घडलं?
या चित्रपटातून प्राजक्ता गायकवाड, अंकित मोहन, रमेश परदेशी असे कलाकार दिसणार आहेत. सध्या नेटकरी या चित्रपटासाठी आतूर झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी या चित्रपटालाही अनेक शुभेच्छा दिल्या आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होईल असं या चित्रपटाच्या पोस्टवर लिहिलं आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रामशेज किल्ल्याचा इतिहास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाशिकजवळ वसलेला हा किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत मावळ्यांनी मुघलांशी तब्बल साडेपाच वर्ष झुंज दिली होती. प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्य केले होते म्हणून या किल्ल्याला रामशेज हे नावं पडलं. हा एक हिंदी शब्द आहे जो भगवान रामाच्या पलंगाला सूचित करतो.
मागील दोन वर्षात ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटांचीच चर्चा आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.