Rana Daggubati as Hiranyakashyap : दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीलाला मोठ्या पडद्याचा 'भल्‍लालदेव' आणि ओटीटीचा 'राणा नायडू' अशी ओळख मिळवली. आता राणा एका नव्या भूमिकेत आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. राणा दग्गुबती हा 'हिरण्यकश्यप' च्या भूमिकेत आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाशिवाय राणा दग्गुबातीनं कॉमिक-कॉनमध्ये त्याच्या आणखी तीन प्रोजेक्ट्स विषयी सांगितलं आहे. आता हे कोणते प्रोजेक्ट्स आहेत ते जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणा डग्गुबातीचा 'हिरण्यकश्यप' हा चित्रपट एका अमर चित्र कथा कॉमिक्सवर आधारीत आहे. त्याची पटकथा ही दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांनी लिहिली आहे. त्यामुळे आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की राणा डग्गुबाती हा राक्षस राजाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता राणा डग्गुबतीसाठी हा एक वेगळाच अनुभव असणार आहे. त्यात राणाला या प्रकारच्या भूमिकेत सगळ्यात आधी प्रेक्षकांनी राणाला 'बाहुबली' फ्रेंचाइजी मध्ये पाहिलं होतं. त्यामुळे आता या भूमिकेत राणा डग्गुबाती कसा अभिनय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार आहे याविषयी अजून कोणती माहिती समोर आलेली नाही. 



सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिग्दर्शक गुणशेखर यांनी त्यांच्या टीमसोबत या प्रोजेक्टवर अनेक वर्षे काम केले. राणानं आधीच सांगितलं होतं की त्याला गुणशेखर यांच्यासोबत काम करायचे आहे. गुणशेखर यांचा हा प्रोजेक्ट आधी प्री प्रोडक्शनमध्ये होता तेव्हा काही कारणांमुळे हा तिथेच थांबला होता. पण आता असं वाटतं की या प्रोजेक्टवक नव्यानं काम सुरु होणार आहे. 


दरम्यान, या चित्रपटाशिवाय राणा डग्गुबातीकडे दिग्दर्शक तेजा यांच्यासोबतचा एक चित्रपट आहे. हा चित्रपट त्याचंच प्रोडक्शन हाऊस 'स्पिरिट मीडिया' करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासोबतच त्यानं मिन्नल मुरली कॉमिक सुपरहीरोची घोषणा केली आहे. याशिवाय 'सोनी लिव' या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी एक वेब सीरिज करणार असून त्याचे नाव 'लॉर्ड्स ऑफ डेक्‍कन' असे आहे. त्याचे प्रोडक्शन देकील त्याचीच कंपनी करणार असल्याचे म्हटले जाते. 


 हेही वाचा : 'सस्ता आयरन मॅन...', Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया


'Lords of The Deccan' ही वेब सीरिज 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन: दक्षिणी भारत से चालुक्यों से चोलों तक' यावर आधारीत आहे. या सीरिजमध्ये आपल्याला चालुक्य या राजवंशचा जन्म पाहायला मिळणार आहे. एक असं राजवंश ज्यांनी बराच काळ दक्षिण भारताला सांभाळालं.