Rana Daggubati : 'बाहुबली' या चित्रपटातील 'भल्लालदेव' ही भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबाती हा नेहमीच चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी त्याच्या राणा नायडू या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमुळे चर्चेत आला होता. राणा त्याच्या खासगी आयुष्याला लाइमलाइटपासून लांब ठेवतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु आहे की राणा दग्गुबातीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगामण होणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार राणानं ही आनंदाची बातमी सगळ्यांपासून लपवलेली असली तरी देखील लवकरच राणा वडील होणार आहे. असे म्हटले जात आहे की राणाची पत्नी मिहिका बजाज ही प्रेग्नंट आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राणानं हा प्रश्न विचारताच त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणानं नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राणाला या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला आहे. तर त्यावर राणानं हो किंवा नाही या दोघांनपैकी काही उत्तर दिलं नाही. तर फक्त त्या बदल्यात राणा हसला. राणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता फक्त त्याच्या चाहत्यांना राणा स्वत: कधी ही बातमी देणार याची प्रतिक्षा आहे. 



राणा आणि मिहीका बजाज बरेच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंकर 8 ऑगस्ट 2020 रोजी लग्न बंधनात अडकले होते. त्यांनी लॉकडाऊन असताना लग्न केलं. त्यांनी खूप कमी लोकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तर गेल्या काही दिवसांपासून तो बाबा होणार या बातमीमुळे चर्चेत होता. मिहिका विषयी बोलायचे झाले तर ती एक यशस्वी इव्हेंट प्लॅनर आहे. 'ड्यू ड्रॉप डिजाइन स्टूडियो' नावाचा तिचा एक स्टूडियो आहे. 


हेही वाचा : "एका मुलानं मला...", Shivali Parab नं 'त्या' प्रपोजल विषयी केला खुलासा


राणाच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. पण तो कॉलेजला गेला नाही. कॉलेजला अॅडमिशन घेतल्याच्या एका वर्षात त्यानं कॉलेज सोडलं. त्यानंतर त्यानं इंडस्ट्रीयल फोटोग्राफी शिकण्यास भर दिली. राणा म्हणाली की हे सांगायला मला लाज वाटत नाही की मी कधी कॉलेजला गेलो नाही किंवा मी एका वर्षात कॉलेज सोडलं. पण हैद्राबादच्या सगळ्यात चांगल्या शाळेतून मी शिक्षण घेतलं आहे. तिथे मला शिकवण्यात आलं की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यावर भर द्या. जेव्हा तुम्ही काही करण्याचा निर्णय घेता तेव्हाच थांबा जेव्हा ते पूर्ण होईल.