मुंबई : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकणारा अभिनेता राणा दग्गुबती 8 ऑगस्ट रोजी आपली मिहिका बजाज सोबत लग्न करणार आहे. कोरोना कालावधीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिहिका ही मुंबईत इंटिरियर डिझायनर आहे. ती ड्युट ड्रॉप डिझाइन स्टुडिओ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोर कंपनी चालवते. तिने लंडनमधून शिक्षण पूर्ण केले असून मिहिकाने लंडनच्या विद्यापीठातून इंटिरियर आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स केले.


मिहिका उत्तर भारतीय कुटुंबातील आहे. पण तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. ती तेलुगु भाषाही बोलते. मिहिका ही राणा दग्गुबतीच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर राहते.


अभिनेत्री लक्ष्मी मंचू यांच्यासह राणा दग्गुबती याने एका इंस्टाग्राम लाईव्ह चॅट सेशनमध्ये सांगितले होते की, मिहिका ही त्याची बहीण आश्रिता (अभिनेता व्यंकटेशची मोठी मुलगी) ची वर्गमैत्रीण होती. राणा मिहिकाला बऱ्याच काळापासून ओळखत होता पण या दोघांमधील नातं जवळपास २ वर्षांपूर्वीच सुरू झालं होतं.


राणा दग्गुबतीच्या मते, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मिहिकाला त्याच्या कुटुंबाची फार पूर्वीपासून ओळख आहे. स्वत: राणा देखील मिहिकाचे कुटुंब आणि मित्रांना ओळखतो.


राणा दग्गुबती यांनी सांगितले होते की, दिवसभर विचार केल्यानंतर मिहिकाला भेटून तिला प्रपोज केले होते. मिहिकाला याची आधीच कल्पना होती.


लग्नाविषयी बोलताना, राणा दग्गुबती आणि मिहिका बजाजच्या कुटुंबियांनी कोरोनामुळे लग्नाचा विधी घरीच करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या ज्युबिली हिल्समधील राणा आणि मिहिकाच्या घरात लग्नापूर्वीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन होत आहेत.