अखेर तो क्षण आलाच; आलिया रणबीरच्या लग्न विधींना सुरुवात; पाहा पहिला फोटो
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सुरुवात पूजाने झाली आहे.
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि आलियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. आतापर्यंत खरंच आलिया आणि रणबीर लग्न करणार? यावर प्रश्नचिन्ह होता. पण आता सगळं काही समोर आलं आहे.
लग्नासाठी पूर्ण तयारी सुरू आहे, पण अद्याप कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्याच्या लग्नाबाबत रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते.
या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत सगळ्यात आधी पूजेने सुरुवात केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आपली मुलगी रिद्धिमा कपूर नातवासोबत लग्नाच्या विधीआधी आयोजित गणेश पूजेला हजर राहण्यासाठी पोहोचल्या आहेत.
यादरम्यान, पापाराझींनी त्यांना पाहिलं आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी म्हणजे आज दुपारी 2 वाजता आलिया भट्टच्या मेहंदीचं फंक्शन सुरू होणार असल्याचं समोर येत आहे. त्यांच्या वांद्रे येथील घरी हा कार्यक्रम होणार आहे.
या फोटोमध्ये रणबीर कपूरची मावशी रीमा कपूरदेखील स्पॉट झाल्या आहेत. रीमा पिवळ्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. 14 एप्रिलला दोघंही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण नंतर असं समोर आलं की दोघंही 15 एप्रिलला लग्न बंधनात अडकू शकतात. मात्र, लग्नाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.