आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक मानलं जातं.
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक मानलं जातं. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न 2020 मध्येच होणार होते. मात्र कोरोनाच्या कहरामुळे संपूर्ण योजना स्थगित करण्यात आली. दरम्यानच्या काळात एक रिपोर्ट समोर आला असला तरी त्यावर नजर टाकली तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची वाट पाहावी लागणार आहे.
एका वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 2021 मध्ये लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. सध्या या कपलचं लग्न पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरं तर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्याही कुटुंबीयांची इच्छा आहे की, हे लग्न मोठ्या प्रमाणावर व्हावं. अशा परिस्थितीत रणबीर आणि आलियाच्या लग्नात कोणत्याही प्रकारची घाई होऊ नये. असं त्यांना वाटतं. रणबीर आणि आलियाचं लग्न २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2022 मध्ये कधी लग्न करणार याबद्दल काहीही सांगता येत नाही. सध्या दोघंही आपापल्या चित्रपटात व्यस्त आहेत. आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय आलिया भट्टने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंगही सुरू केलं आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलियाही दिसणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून रणबीर कपूर चित्रपट निर्माता आनंद एल राय यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय रणबीर कपूर आलिया भट्टसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.