मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, हे कपल पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सात फेरे घेणार आहेत. लग्नाच्या बातम्यांदरम्यानच, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा साडी फॅशन ब्रँड आणि डिझायनरसोबतचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. यानंतर त्यांचे चाहते चांगलेच उत्साहित झाले असून दोघांनीही त्यांच्या लग्नाची खरेदी सुरू केल्याची शक्यता वर्तवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा फोटो
ब्राईडल कांचीपुरम साडी ब्रँडच्या सीईओ बीना कन्नन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया भट्ट पांढऱ्या कुर्त्यात तर रणबीर कपूर निळ्या शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. दोघांचा हा फोटो समोर येताच चाहत्यांनी यांचं लग्न होतयं का असा अंदाज बांधायला सुरुवात केली .यासोबतच फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू झाला. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, 'हा लग्नाचा ईशारा आहे  का?' तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की, 'लग्नाची खरेदी.' अशाप्रकारे सगळ्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.


या कपलने आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमधून मागितली होती सुट्टी 
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याबद्दल पहिली बातमी आली होती की, दोघंही याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. नंतर ही तारीख सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत पोहोचली आणि आता नवीन तारखेबद्दल बोलायचं झालं तर, दोघंही पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. मात्र अद्याप निश्चित तारीख ठरलेली नाही. 



एका वृत्तानुसार,  ''इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा आहे की रणबीर आणि आलिया एप्रिल 2022 मध्ये लग्न करणार आहेत. अलीकडेच रणबीर कपूरची आई नीतू कपूर सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये आणि मनीष मल्होत्रा ​​त्यांच्या घरी स्पॉट झाली. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमधून सुट्टीही मागितली आहे.