आलिया भट्टच्या `या` सवयीने रणबीर हैराण, थेट केली तक्रार
आलियाचा स्वभाव रणबीरचा खटकला, थेट केली तक्रार
मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया या सिनेमात गंगुबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेकरता आलियाने प्रचंड मेहनत घेतली आहे. एवढंच नाही तर आलिया या भूमिकेवरून रणबीर कपूरला देखील त्रास देताना दिसत आहे. रणबीरने याबाबत तक्रार देखील केली आहे.
आलियामुळे रणबीर हैराण
भन्साळी म्हणतात की, आलिया खऱ्या आयुष्यातही गंगुबाई झाली आहे. तिच्या बॉयफ्रेंडने म्हणजे रणबीरने सांगितलं की, ती घरी देखील गंगूबाई सारखं वागते.
भन्साळी पुढे म्हणतात की, आलिया अगदी खासगी आयुष्यातही गंगूबाई या भूमिकेशी जोडली आहे.
भन्साळी यांच्याकडून आलियाचं कौतुक
संजय लीला भन्साळी यांनी आलियाच्या डान्सचं कौतुक केलंय. मला माहित नव्हतं की, आलिया इतकी सुंदर डान्स करते. 'ढोलिडा' या गाण्यावर आलियाने उत्तम परफॉर्मन्स केला आहे.