मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या करिअरबाबत चिंतित आहे. रणबीरकडे सध्या तरी कोणताही सिनेमा नाही आणि तो सध्या करिअरमध्ये कोणतीच रिस्क घेणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी रणबीरने एक निर्णय घेतलाय. रणबीरने दोन नव्या रोमँटिक सिनेमांचे प्रस्ताव नाकारले. काही दिवसांपूर्वीच रणबीरने या सिनेमांच्या ऑफर रिजेक्ट केल्या


रोमँटिक सिनेमा करण्याच्या मूडमध्ये सध्या तो नाहीये. थोडे हटके आणि वेगळे सिनेमे त्याला करायचे आहेत. त्यामुळेच एकाच पठडीतले सिनेमे करण्यास त्याने नकार दिलाय. ज्यामुळे त्याच्या स्टारडमवर कोणताही परिणाम होणार नाही.


नुकताच रणबीरने संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. यानंतर तो करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊसच्या ब्रह्मास्त्र या सिनेमाचे शूटिंग करणार आहे.