मुंबई : रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अगदी 16 व्या दिवसापर्यंत या सिनेमाने 300 करोड रुपयांची कमाई दूर केली आहे. 17 व्या दिवशी देखील हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. संजूची कमाई सगळ्यांची झोप उडवत आहे. 


संजूने केली एवढी कमाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संजू'ने बॉक्स ऑफिसवर कमाई करून एक बेंचमार्क तयार केला आबे. त्यामुळे यापुढे प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचा रस्ता कठीण झाला आहेय संजूने पहिल्या आठवड्यातच 110 करोड रुपये कमाई केली असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. आणि त्यांनी अशा प्रकारे त्याला लोकप्रियता देखील तशीच मिळवून दिली आहे.  ओपनिंग डे ला या सिनेमाने 34.75 कोटींचा गल्ला करुन रेस ३ सिनेमाला मागे टाकले. आता या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. आता संजू सिनेमाने वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.


हे यश संपूर्ण बॉलिवूडसाठी अभिमानास्पद आहे. तर देशातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ३०० कोटींची मजल मारली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकड्यांनुसार, संजू सिनेमाने सुरुवातीच्या १३ दिवसात २८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. यानुसार, संजू हा सिनेमा २०१८ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार आहे. संजूची कमाई पाहता या सिनेमाने पद्मावतलाही मागे टाकले आहे. पद्मावतने बॉक्स ऑफिसवर २८२ कोटींची कमाई केली होती.


संजूला या सिनेमा रोखणार


आता संजू या सिनेमाकडे अवघे 4 दिवस उरले आहेत. कारण शशांक खेतानचा 'धडक' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. धडक हा सिनेमा मराठीतील ब्लॉक ब्लस्टर सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे. या सिनेमातून जान्हवी आणि ईशान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतूर आहेत. त्यामुळे आता संजूला थोडी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.