मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor 40th Birthday) आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतर रणबीरचा हा पहिला वाढदिवस आहे. एकीकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर दुसरीकडे 'ब्रम्हास्त्र' चं सक्सेस हे एकत्र रणबीरला पाहायला मिळतं आहे. सध्या रणबीर 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या सेटवर सुरु रणबीर आणि आलियाची लव्ह (Ranbir Kapoor and Alia Bhatt's Relationship) स्टोरी सुरु झाली. त्यावेळी हे दोघं कधी लग्न करतील असं कोणाला वाटतं नव्हतं. कारण याआधी रणबीर अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आज त्याच्या वाढदिवसा निमित्तानं रणबीरच्या गर्लफ्रेंड्स विषयी जाणून घेऊया... (Ranbir Kapoor Got Married To Alia Bhatt) 


आणखी वाचाफॅशन करणं Janhvi Kapoor ला पडलं महागात, झाली Oops Moment ची शिकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवंतिका मलिक 
रणबीरची पहिली गर्लफ्रेंड ही अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) पुतन्या आणि अभिनेता इमरान खानची (Imran Khan's Wife) पत्नी अवंतिका मलिक (Avantika Malik) होती. अवंतिका ही रणबीरची कॉलेजमेट आहे. कॉलेजमध्ये असताना ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते पण पुढे जाणून त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अवंतिकानं इमरानशी लग्न केलं. (Imran and Avantika Got Married)


सोनम कपूर
रणबीरनं 'सावरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रणबीरसोबत अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लेक सोनम कपूरनं (Anil Kapoor's Daughter Sonam Kapoor) देखील याच चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, त्या दोघांनी याविषयी कधीच अधिकृतपणे सांगितले नाही. 


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


नरगिस फाखरी
रणबीरचा चर्चेत राहिलेला चित्रपटांपैकी एक म्हणजे 'रॉकस्टार' (Rockstar) हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीरसोबत नरगिस फाखरी (Nargis Fakhri) दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि नरगिसची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. 


दीपिका पदुकोण
रणबीर आणि दीपिका (Deepika Padukone) याचं अफेअर हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अफेरची चर्चा ही नेहमीच सुरु असायची. या शिवाय त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. 'बचना ऐ हसीनो' या चित्रपटापासून त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरवात झाली. रणबीरसोबत एका सीरिअस रिलेशनशिपमध्ये असलेल्या दीपिकानं तिच्या मानेवर RK असा टॅटूसुद्धा काढला होता. जितकं त्यांचं अफेअर चर्चेत राहिलं तितकंच त्याचं ब्रेकअप. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डीप्रेशनमध्ये गेली होती. 


आणखी वाचा : एक वर्षापूर्वीचं 'ते' प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी


कतरिना कैफ
दीपिकानंतर रणबीर कतरिनासोबत (After Deepika Padukone Ranbir In Relationship With Katrina Kaif) रिलेशनशिपमध्ये आला होता. दोघं बरेच दिवस लिव्ह- इन - रिलेशनशिपमध्ये राहिल्याच्याही चर्चा होत्या. लिव्ह- इन - रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला असे म्हटले जात होतं. त्यानंतर काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. 


आलिया भट्ट
कतरिनानंतर रणबीर आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) रिलेशनशिपमध्ये आला आणि आज तिच त्याची पत्नी आहे. शिवाय ते दोघं लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.