मुंबई : रणबीर कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच वडिल होणार आहे. दुसरीकडे प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर तो त्याची पत्नी  आलियासोबतचा ब्रह्मास्त्र हा त्याचा पहिला चित्रपटही लवकरच रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचं लोकप्रिय गाणं 'केसरिया' आज रिलीज झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे चाहत्यांना खूप आवडलं आहे. त्याचबरोबर, गाणं रिलीज झाल्यानंतर आता रणबीरचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर सहज गाणी ऐकताना दिसत आहे.


रणबीर आलियाचं  गाणं 'केसरिया' रिलीज झालं आहे. या गाण्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आपल्या नवीन घरात सहजतेने गाणं ऐकताना दिसत आहे. त्याच्यासोबत आर्यन मुखर्जीही दिसत आहे. गाणं ऐकून दोघंही गाण्यात मग्न होताना दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कामाबद्दल बोलायचं झालं तर रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' सिनेमाआधी त्याचा 'शमशेरा' चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर आहे. त्याचबरोबर आलिया भट्टने तिच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. त्याचबरोबर सध्या तो डार्लिंगमुळे चर्चेत आहे.