`रामायण`मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल तर बिग बींवर `ही` मोठी जबाबदारी
Ranbir Kapoor and Amitabh Bachchan in Ramayana : रणबीर कपूरचा डबल रोल ते बिग बींवर मोठी जबाबदारी... नक्की काय पाहायला मिळणार `रामायण` चित्रपटात
Ranbir Kapoor and Amitabh Bachchan in Ramayana : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' हा चित्रपट बॉलिवूडमधील चर्चेत असणाऱ्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी या चित्रपटांची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण कलाकारांच्या मुलाखती आणि सेटवरून समोर आलेल्या फोटोंमध्ये हे दिसण्यात आलं आहे की नितेश तिवारी, रामायणची कथा ही भव्य पद्धतीनं पडद्यावर घेऊन येण्यासाठी तयार आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि साई पल्लवी ही त्यांची पत्नी अर्थात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हनुमानाची भूमिका सनी देओल, लक्ष्मणची भूमिरा रवि दुबे आणि कैकेयीची भूमिका लारा दत्ता साकारणार आहे. आता या चित्रपटातून दोन महत्त्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत.
पीपिंग मूनच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रणबीर कपूर, 'रामायण' चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. जेव्हा श्रीराम महादेवाचं धनुष तोडतात तेव्हा रागात तिथे परशुराम तिथे पोहोचतात. त्यानंतर त्या दोघांमध्ये एक कमालीचा संवाद होतो त्याचा उल्लेख रामायणात पाहायला मिळत आहे.
हिंदू पौराणिक कथांमध्ये राम आणि परशुराम, दोन्ही विष्णु देवाच्या भूमिका होत्या. परशुरामची भूमिका आणि रामची कथा ही छोटी असली तरी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर निर्मात्यांनी हे ठरवलं की ते तेव्हापासून चित्रपटातील परशुरामची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे दोघं विष्णुच्या अवतारांच्या भूमिका या रणबीर साकारणार आहेत. परशुराम यांच्या लूकमध्ये रणबीरचा लूक खूप वेगळा असणार आहे आणि त्याला ओळखणं खूप कठीण होणार आहे.
अमिताभ यांच्यावर मोठी जबाबदारी
रिपोर्ट्सनुसार, बिग बी अमिताभ बच्चन देखील या चित्रपटाचा भाग होणार आहेत. खरंतर, ते स्वत: स्क्रीनवर दिसणार नाहीत. तर असं म्हटलं जातं की अमिताभ हे या चित्रपटात जटायुच्या भूमिकेला आवाज देणार आहेत.
हेही वाचा : सेलेना गोमेज कधीच होऊ शकणार नाही आई! 32 वर्षांच्या गायिकेनं कारण सांगत व्यक्त केल्या भावना
या भूमिकेला पडद्यावर VFX च्या मदतीनं दाखवण्यात येणार आहे आणि त्याचा लूक चांगला करण्यासाठी अमिताभ यांचे डोळे देखील स्कॅन करण्यात येणार आहे. अनेक चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्ट्ससाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकलेली इंडियन कंपनी DNEG आणि KGF अभिनेता यशची कंपनी मिळून 'रामायण' ची निर्मिती करणार आहे. रिपोर्ट्सविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचं बजेट हे 100 मिलियन डॉलर अर्थात जवळपास 800 कोटी इतकं असल्याचं म्हटलं जातं.