रणबीर कपूरचा मस्क्युलर लूक संजय दत्तच्या बायोपिकसाठी नव्हे तर `या` आगामी चित्रपटासाठी !
संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची निवड झाल्यानंतर त्यानेही व्यक्तीरेखेसाठी खूप मेहनत घ्यायला सुरवात केली आहे.
मुंबई : संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची निवड झाल्यानंतर त्यानेही व्यक्तीरेखेसाठी खूप मेहनत घ्यायला सुरवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी रणवीरचा मस्क्युलर लूकमधील एक फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. तो फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचा संबंध संजय दत्तच्या बायोपिकशी जोडला. पण एका रिपोर्टनुसार, रणबीर कपूर त्याच्या शरीरावर घेत असलेली ही मेहनत सुपर नॅचरल फिल्म 'ड्रॅगन' साठी आहे.
'ड्रॅगन' साठी रणवीर कशी घेतोय मेहनत ?
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, रणबीर कपूरचा ट्रेनर कुणाल याने मुलाखतीमध्ये रणबीर कपूर आणि त्याच्या खास लूकमधील व्हायरल होणारा फोटो याबाबत खुलासा केला आहे. रणबीरने फोटो अपलोड करताना कोणत्याच चित्रपटाचा उल्लेख केला नव्हता. पण कुणालने दिलेल्या माहितीनुसार रणबीर 'ड्रॅगन' या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शरीरावर खास मेहनत घेत आहे.
आयन मुखर्जी 'ड्रॅगन' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. "मला ड्रॅगन या चित्रपटासाठी बोलावण्यात आले होते. पण त्यानंतर मी संजय दत्तच्या बायोपिकसाठीदेखील काम करायला लागलो." असे कुणालने सांगितले आहे.
रणबीर कपूरने संजय दत्तच्या भूमिकेसाठी सुमारे 14 किलो वजन वाढवले आणि 'ड्रॅगन' या चित्रपटासाठी 8 किलो वजन कमीदेखील केले आहे.