मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग तुफान चर्चेत आहे. आलिया तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे तर, दुसरीकडे रणवीर न्यूड फोटोशूटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आलिया आणि रणवीरने 'गली बॉय' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाला आणि दोघांच्या जोडीला चाहत्यांना डोक्यावर घेतलं. 'गली बॉय' सिनेमानंतर आलिया-रणवीर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार असा प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. तर दुसरीकडे आलियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रणवीर पाठवत असलेल्या मेसेजबद्दल सांगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया म्हणते, 'रणवीर कायम मला मीम्स, जोक्स आणि GIF's' पाठवत असतो. मी कधी त्याला रिप्लाय देत नाही. पण तो जे मेसेज करतो, ते मला फार आवडतात.' सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. आलिया आणि रणवीरबद्दल सांगायचं झालं तर, दोघेही बॉलिवूडमधील यशस्वी कलाकारंपैकी एक आहेत. आलिया भट्ट स्टारर 'डार्लिंग्स' सिनेमाने देखील प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. 


'ओटीटी' प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'डार्लिंग्स' सिनेमाने रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. एवढंच नाही तर. 2022 च्या सर्वेनुसार आलिया भारतीतल प्रसिद्ध अभिनेत्रींच्या तिसऱ्या स्थानावर आहे.