Randeep Hooda Is Marrying 10 year younger girlfriend : सध्या बॉलिवूडमध्ये लग्न सराई सुरु झाली आहे. एकामागे एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. या सगळ्यात आता अभिनेता रणदीप हुड्डानं देखील नंबर लावला आहे. रणदीप हुड्डा हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. रणदीप त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत सप्तपदी घेणार आहे. ते दोघं या महिन्याच्या शेवटपर्यंत लग्न बंधनात अडकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, या लग्नात फक्त दोघांच्या कुटुंबातील काही लोक आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. ते दोघं मुंबईत लग्न बंधनात अडकणार नाही आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या जवळच्या लोकांना यासंबंधीत कोणत्याही गोष्टीवर चर्चा करायची नाही. लग्न झाल्यानंतर ते दोघं याविषयी घोषणा करणार आहेत. मात्र, अजुनही त्यांच्या लग्नाची तारिख सांगितलेली नाही. त्याचं कारण म्हणजे रणदीप हा प्रायव्हेट व्यक्ती आहे. आता लग्नाच्या या बातमीनं रणदीपच्या अनेक चाहत्यांना धक्का बसणार आहे. 



हेही वाचा : 4 अफेयर्स 3 लग्न, पण एका ब्रेकअपनं बदललं 'या' सुपरस्टारचं आयुष्य; 'प्रेमात होतो तेव्हा तिनं मला...'


रणदीप हुड्डा हा आता 47 वर्षांचा असून गेल्या अनेक काळापासून तो त्याच्याहून 10 वर्षे लहाण म्हणजेच 37 वर्षांच्या लिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांनी यावर कधीच चर्चा केली नाही. पण 2021 मध्ये लिनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रणदीपनं याविषयी एक हिंट दिली होती. इतकंच नाही तर गेल्या वर्षी त्या दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली होती. यानंतर दोघं सोशल मीडियावर एकमेकांचे अनेक फोटो शेअर केले. दरम्यान, रणदीपच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तो ‘वीर सावरकर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय याच चित्रपटातून रणदीप एक दिग्दर्शक म्हणून देखील याच चित्रपटातून पदार्पण करणार आहे. लिनविषयी बोलायचे झाले तर ती 'ओम शांती ओम', 'मेरी कॉम' आणि 'रंगून' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती नुकताच प्रदर्शित झालेल्या करीना कपूरच्या ‘जाने जां’ या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटात तिनं करीना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. लिन ही मणिपुरची असून इंडियन मॉडेल आहे.