मुंबई : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणुसकी अंधूक झालेली दिसते. पण आजही असे काही व्यक्तीमत्व आहेत, ज्यांनी केलेलं कार्य माणुसकीचं उत्तम उदाहरण आहे.  रक्ताच्या नात्यासाठी तर प्रत्येक जण धावत जातो, पण इथे तर अभिनेत्याने मानलेल्या बहिणीसाठी पाऊल पुढे टाकल. अभिनेता रणदीप हुड्डाने 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरबजीत' सिनेमामध्ये सरबजीत सिंगची मुख्य भूमिका साकारली होती. सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौर यांचे नुकतेच निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलबीर कौर यांना पंजाबमधील अमृतसरजवळील त्यांच्या मूळ गावी भिखीविंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यावेळी दलबीर कौर यांच्या अंत्यसंस्कारासाठी रणदीपही अमृतसरला पोहोचला आणि बहिणीला अग्नी दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रणदीपने मानलेल्या बहिणीसाठी प्रार्थना सभा देखील ठेवली आहे.



रणदीपने प्रर्थना सभेचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये भाऊ म्हणून रणदीपचं नाव आहे. दलबीर कौर यांच्या निधनानंतर रणदीपने भावुक पोस्ट देखील शेअर केली आहे. 



रणदीप भावना व्यक्त करत म्हणाला, दलबीर कौरजी इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. भाऊ सरबजीतला वाचवण्यासाठी त्या एका व्यवस्थेविरुद्ध आणि एका देशाविरुद्ध लढल्या.


अभिनेता पुढे म्हणाला, 'त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.  पंजाबच्या शेतात शूटिंग करताना आमची शेवटची भेट झाली होती. मी तुमच्याझ्यावर प्रेम करेल, नेहमीच तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची कदर करेल.'