Randeep Hooda Lin Laishram bold Photo: सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी 31 डिसेंबरला जोरदार सेलिब्रेशन केले. नव वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाने वेगवेगळे प्लान आखले होते. आपल्याला सर्वांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटो यामध्ये जास्त चर्चेत आहे. यात अभिनेता रणदीप हुडा आणि त्याची बायको लिनच्या फोटोंचा समावेश आहे. दोघांच्या बोल्ड फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांनी नवीन वर्ष 2024 चे जल्लोषात स्वागत केले. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी, चित्रपट कलाकारांनी त्यांच्या आवडत्या ठिकाणी नवीन वर्षाच्या उगवत्या सूर्याचे स्वागत केले आणि धमाकेदार पार्टी केली. बहुतेक स्टार नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले असताना, रणदीप हुडाने केरळमध्ये पत्नी लिन लैश्रामसोबत नवीन वर्ष साजरे केले. दोघेही नुकतेच केरळला पोहोचले आणि तिथे एकत्र चांगला वेळ घालवला.


रणदीप हुड्डाने त्याच्या व्हेकेशनमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही रोमँटिक आणि एकमेकांमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत. लिन लैश्रामने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.



लिनला मोनोकिनीत पाहून यूजर्स आश्चर्यचकित


रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. चाहत्यांनी या जोडप्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर लिन लैश्रामला पाहून काही यूजर्सनी असभ्य कमेंट्स केल्या. एका यूजरने लिहिले की, 'लग्नानंतर मला एवढेच करायचे होते.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते.' पण या नकारात्मकतेमध्येही असे अनेक लोक आहेत जे मनापासून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नीना गुप्ता यांनीही रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिली. सुंदर, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


सोनाली बेंद्रे हरिद्वारमध्ये 


सोनाली बेंद्रेने वर्षाची सुरुवात करण्यासाठी वेगळा आणि सर्वात अनोख मार्ग निवडला. कारण अभिनेत्रीने यावर्षी पार्टी सोडून अध्यात्माकडे जाण्याचा निर्णय घेतला. ई-रिक्षाच्या सफरीसह तिने हरिद्वारला फॅमिली ट्रिप केली. याची माहिती देताना सोनालीने काही फोटोही शेअर केले आहेत. सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहलसोबत हरिद्वारला पोहोचली आहे. सोनालीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि काही मिनिटांतच ते व्हायरल झाले. मुलगा आणि पतीसोबत एकत्र कुटुंब पाहून लोक तिची प्रशंसा करत आहेत.अशा प्रकारे सोनाली बेंद्रेने हरिद्वारमध्ये तिचे नवीन वर्ष साजरे केले. सोनालीने तिच्या इंस्टाग्रामवर पवित्र शहर हरिद्वारचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, सोनालीने 18 वर्षांचा मुलगा रणवीरसोबत तिची ई-रिक्षाची सफर दाखवली.