`त्या` अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?
Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार
Randeep Hooda : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं 2016 मध्ये बायोग्राफिकल ड्रामा 'सरबजीत' चित्रपटातून सगळ्यांच्या मनात छाप सोडली होती. या देशाची निर्मिती ही ओमंग कुमार यांनी केली होती, तर रणदीपनं या चित्रपटात सरबजीत सिंग यांची भूमिका साकारली होती. दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. हे बातमी कळल्यानंतर रणदीप हुड्डानं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सरबजीत सिंग यांच्या हत्येचा आरोपी सरफराज उर्फ तांबाच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर रणदीप हुड्डानं एक पोस्ट शेअर करत त्या अज्ञात हल्लेखोरांचे आभार मानले आहे. रणदीपनं ही पोस्ट त्याच्या आधीच्या ट्विटर म्हणजे X अकाऊंटवरून शेअर केली आहे. यात रणदीप म्हणाला की कर्मा... जे तुम्ही करतात ते तुमच्याकडे परत फिरून येतं. 'अज्ञात हल्लेखोरांचे' आभार. मला माझी बहीण दलबीर कौरची आठवण येतेय. पूनम आणि स्वप्नदीपला माझं खूप प्रेम. सरबजीत सिंगला अखेर न्याय मिळाला.
कोण होते सरबजीत सिंग?
सरबजीत सिंग भारत-पाकिस्तानं सीमेवर राहणारे एक शेतकरी होते. 30 ऑगस्ट 1990 ला ते चुकून पाकिस्तानच्या सीमेवर पोहोचले. त्यावेळी त्वरीत पाकिस्तानी सेनेनं त्यांना अटक केली. पाकिस्तानच्या एका कोर्टानं त्यांना लाहौर, मुल्तान आणि फैसलाबादच्या बॉम्बस्फोटासाठी दोषी ठरवलं आणि 1999 मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. खरंतर, सरबजीतच्या कुटुंबानं हा युक्तिवाद केला की, पाकिस्ताननं जबरदस्तीनं त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवलं आहे. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यामुळे पाकिस्तानला सरबजीत यांच्या फाशीचा निर्णय रद्द करण्यात आला.
पुढे सरबजीत यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण देशाला ही आशा होती की सरबजीत परत येतील. पण एप्रिल 2013 मध्ये कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजनं सरबजीत यांची पॉलीथिननं गळा दाबून आणि मारहाण करुन हत्या केली. यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या सरबजीत यांना लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या काही दिवसातच उपचारा दरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या म्हणण्यावरून अमीर सरबजीत यांची हत्या करण्यात आली होती.