मुंबई : झी मराठीवर 'वेध भविष्याचा' आणि नुकत्याच सुरू झालेल्या पौराणिक मालिकेत भगरे गुरूजी. झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात आहे. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. भगरे गुरूजी आपल्या शैलीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. भगरे गुरूजी यांची मुलगी सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री 'अनघा अतुल भगरे' ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. 'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केलं आहे.



अनघाचं नाशिक शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. 



याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. कॅमेऱ्या मागे राहून काम करत असलेल्या अनघाला भविष्यात कॅमेऱ्यासमोर काम करावे लागेल याची कल्पना तिने केली नसावी.