राणी मुखर्जीच्या `या` ब्लॅक जॅकेटची किंमत ऐकूण तुम्ही चक्रावून जाल
पार्टी असो किंवा एखादा इव्हेंट असो बॉलिवूड स्टार्स आपल्या फॅशनेबल कपड्यांमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. तसेच आपल्या लूकमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.
मुंबई : पार्टी असो किंवा एखादा इव्हेंट असो बॉलिवूड स्टार्स आपल्या फॅशनेबल कपड्यांमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. तसेच आपल्या लूकमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.
एअरपोर्ट लुक चर्चेचा विषय
लग्न, पार्टी तर सोडाच सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या एअरपोर्ट लुक्समुळे सर्वांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत असल्याचं पहायला मिळत आहे. फ्लाईटवर चढण्यापूर्वी किंवा उतरल्यानंतर सेलिब्रेटी हे फोटोग्राफर्ससमोर चांगला लूक देण्याचा प्रयत्न करतात.
तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
नुकतचं बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी मुंबई विमातळावर पहायला मिळाली. यावेळी राणी मुखर्जी स्पोर्टी लूकमध्ये दिसली. राणीने परिधान केलेल्या जॅकेटची किंमत इतकी होती की ती ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल.
एक लाखापेक्षा महाग जॅकेट
राणी मुखर्जीने टी-शर्ट, डेनिम आणि ब्लॅक कलरचं लेदर जॅकेट घातलं होतं. या जॅकेटची किंमत तब्बल १४९५ पाऊंड म्हणजेच १ लाख ३० हजार रुपये आहे. या जॅकेटमध्ये राणी खूपच सुंदर दिसत होती. मात्र, या जॅकेटची किंमत अपेक्षापेक्षा खूपच अधिक होती.
'मर्दानी' राणी
अभिनेत्री राणी मुखर्जी २०१४ साली 'मर्दानी' सिनेमात दिसली होती. राणीने आपली मुलगी आदिराचा सांभाळ करण्यासाठी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. आता राणी मुखर्जी लवकरच पुनरागमन करणार आहे.
'हिचकी' सिनेमातुन पुनरागमन
पुढील वर्षात यशराज प्रोडक्शनच्या 'हिचकी' या सिनेमात राणी पुन्हा दिसणार आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचं शुटिंग संपलं असून राणी मुखर्जी लकरचं प्रमोशन करण्यास सुरुवात करणार आहे