बॉलिवूडमधील ही अभिनेत्री म्हणाली, तरीही सलमानवरील माझे प्रेम कायम!
काळवीट शिकार प्रकरणी सलमानला जोधपूर न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमानला जोधपूर न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानचे चाहते चांगलेच हळहळले. तर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सलमानला आपला पाठींबा दर्शवला.
या अभिनेत्रीचे सलमानवरील प्रेम कायम
सलमानच्या पाठीशी असलेल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने सलमानप्रती माझे प्रेम कायम राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे राणी मुखर्जी. राणीने सलमानसोबत अनेक सिनेमात काम केले आहे.
ती म्हणाली की...
आयएएनएसच्या वृत्तानुसार, सलमानच्या शिक्षेबद्दल विचारले असता ती म्हणाली की, मी नेहमीच हे सांगत आले आहे की माझे प्रेम कायम सलमानसोबत असेल.
हे कलाकार निर्दोष
या प्रकरणात सलमानसोबत हम साथ साथ है मधील अनेक सहकलाकार सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू आणि निलम हे कलाकारही आरोपी होते. मात्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले.