एका Kiss मुळे तुटलं अभिषेक बच्चन - राणी मुखर्जीचं नातं; बच्चन कुटूंबाची सून होता-होता राहिली अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्मा कपूरसोबत साखरपुडा तुटल्यानंतर राणीच बच्चन कुटूंबाची सून होणार यावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. मात्र...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिला अनेक बॉलिवूड स्टार्स शुभेच्छा देताना दिसत आहेत. राणी मुखर्जीने तिच्या मेहनतीने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे आजही राणी मुखर्जीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.
एककाळ असा होता जेव्हा अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन एकमेकांच्या खूप जवळ होते. बर्याच चित्रपटातही या दोघांनी एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या जोडीलाही चांगली पसंती मिळत होती. सिनेसृष्टीत या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चाही चांगल्याच रंगू लागल्या होत्या.
करिश्मा कपूरसोबत साखरपुडा तुटल्यानंतर राणीच बच्चन कुटूंबाची सून होणार यावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. मात्र अभिषेकने राणीसोबत लग्न न करता ऐश्वर्यासोबत लग्न करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एका सिनेमात किसींग सीन दिल्यामुळे जया बच्चन राणीवर नाराज झाल्या होत्या आणि हेच अभिषेक आणि राणी मुखर्जी यांचं नात तुटण्याचं कारण मानलं गेलं.
अमिताभ यांच्यासोबत किसींग सीन
राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी 'ब्लॅक' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या शेवटी एक लिप किस होता ज्यात राणी आणि अमिताभ बच्चन लिपकिस करतात. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात दोघांना लिपकिस सीन शूट करायचा होता. दोघांनीही या सिनेमात जीव ओतून अभिनय केला होता.
दोघांच्याही अभिनयाचं सगळीकडून कौतूक होत होतं असं असलं तरीही, जया बच्चन यांना लिप किसिंग सीनवर आक्षेप होता. आपल्या भावी सुनेने सासऱ्यांना किस करावं असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. याचा फटका राणीला अभिषेक बच्चनसोबत नातं तुटण्याच्या रूपाने सहन करावा लागला.
राणीने व्यक्त केली होती नाराजी
या एका सीनमुळे जया बच्चन राणीवर एवढ्या नाराज झाल्या की, राणी मुखर्जीला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नातही बोलावण्यात आलं नाही. अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं.
राणीने शाहरुख खान ते सलमान खानपर्यंत सगळ्याच स्टार्ससोबत काम केलं आहे. मात्र राणीने अनेक चित्रपट नाकारलेही होते, त्यानंतर तिला याचा खूप पश्चाताप झाला होता.