दुसऱ्यांदा होणार होती आई, पण 5 व्या महिन्यात झाला गर्भपात; राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा
Rani Mukherjee Was Pregnant Second Time : रानी मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं. पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं केला आहे.
Rani Mukherjee Was Pregnant Second Time : बॉलिवूड अभिनेत्री रानी मुखर्जी ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीये का रानी मुखर्जीला तिचं खासगी आयुष्यावर चर्चा करायला आवडत नाही. रानी मुखर्जी पहिल्यांदात तिच्या गर्भपातावर बोलली आहे. रानी मुखर्जीनं खुलासा केला की कोव्हिड 19 मध्ये ती प्रेग्नंट होती. पण 5 महिन्यात तिचा गर्भपात झाला. या भयानक परिस्थितीतून बाहेर येणं तिच्यासाठी खूप कठीण होतं.
रानी मुखर्जीनं इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2023 मध्ये तिच्या गर्भपाताविषयी सांगितलं आहे. 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटाविषयी बोलत असताना रानी मुखर्जी म्हणाली की कोरोना काळात ती दुसऱ्यांदा आई होणार होती. ती प्रेग्नंट होती, पण पाच महिन्यात तिचा गर्भपात झाला. तिनं ही गोष्ट चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितली नव्हती, कारण लोक म्हणाले असते की हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केलं आहे.
मेलबर्नच्या स्टेजवर राणी मुखर्जी म्हणाली, 'मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्याबद्दल अशा प्रकारे पब्लिकली बोलते. 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'च्या प्रमोशनच्या वेळीही मी माझ्या वेदना व्यक्त केल्या नाहीत. लोकांनी माझे वैयक्तिक आयुष्य चित्रपटाशी जोडून पाहावे आणि स्ट्रॅटर्जीसाठी हे सगळं होत आहे. कोविड 19 च्या वेळी म्हणजे 2020 मध्ये मी गरोदर होते. आम्ही दुसऱ्यांदा पालक होणार होतो. पण दुर्दैवाने मी माझे 5 महिन्यांचे बाळ गमावले. माझा गर्भपात झाला.'
हेही वाचा : या ग्रहावरील कुठलीच ताकद आपल्याला वेगळं ठेवू शकत नाही; जॅकलीनच्या लव्हरचं जेलमधून प्रेमपत्र!
रानी मुखर्जीचा 'मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे' हा चित्रपट याच वर्षी 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट नॉर्वेत राहणाऱ्या एका कुटुंबावर आधारीत आहे. ही सत्यघटनेवर आधारीत आहे. रानी मुखर्जीनं या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिच्या दोन्ही मुलांना नॉर्वे सरकार तिच्यापासून लांब घेऊन जातात. त्या चित्रपटात तिच्या मुलांसाठी नॉर्वे सरकारच्या विरोधात जाताना पाहते. हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीला भावूक करणारा आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बरनं केलं आहे. रानी मुखर्जीच्या पतीचं नाव आदित्य चोप्रा आहे. आदित्य चोप्रा हे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आहे. 2014 मध्ये आदित्य आणि रानी मुखर्जी यांचं लग्न झालं होतं. आदित्य चोप्रा हे यशराज फिल्मचे मालक आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून अदिरा असे तिचे नाव आहे.