मुंबई : देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आजच्या मुली सुरक्षित नाहीत. दर वर्षी भारतात २ हजारांपेक्षा जास्त बलात्कार होतात. हे बलात्कार १८ वर्षांखालील तरूणांकडून केला जात असल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी २' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. देशात अत्याचार, बलात्कार यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक घडलेल्या घटनांवर चित्रपटं देखील साकारण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. ‘मर्दानी २’ चित्रपट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. 


‘मर्दानी २’चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरेण करणार आहेत. गोपी पुथरेण या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहेत. १३ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.