रानू मंडलची सलमान खानसोबत जुगलबंदी व्हायरल; Video समोर
रानू मंडलने एकेकाळी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं.
मुंबई : 'बसपन का प्यार'चा सहदेव दीरदो आणि 'कच्चा बदाम'चा भुबन बद्यकर सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याआधी राणू मंडलने आपल्या आवाजाने देशभरात खळबळ निर्माण केली. यानंतर रानू मंडलने एकेकाळी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं. तिच्या मुलाखती आणि व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होऊ लागले. बरेच दिवस गायब असलेली रानूचा आणि सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल आणि सलमान खान 'हाल कैसा है जनाब का' हे गाणं म्हणत आहेत.
पण खरं काही वेगळंच आहे. हा व्हिडिओ खरा नसून एडिटींग आहे. या व्हिडिओमध्ये दोघांच्या वेगवेगळ्या क्षणांचे व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. ज्यावर हे गाणं टाकण्यात आलं आहे. अशाप्रकारे हा व्हिडिओ खूपच मजेदार झाला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो कधीही बघायला खूप मजेदार वाटतो.
राणू मंडलचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर ती रातोरात स्टार झाली. राणू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांच्या आवाजात गाणी म्हणायची. अशीच एक दिवस ती आपल्या टॅलेंटने स्टार झाली. त्याचबरोबर तिने हिमेश रेशमियाचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणंही गायलं आहे.
असो, काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, रानू मंडलवर बायोपिकही बनणार आहे. 'मिस राणू मारिया' असं या चित्रपटाचं नाव असून हृषिकेश मंडल याचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री इशिका डे राणू मंडलची भूमिका साकारणार आहे.