मुंबई : कधी कोणाच्या आयुष्यात सोनेरी दिवस येईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. एका रात्रीत गगन भरारी घेण्याऱ्या रानू मंडल आता प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत पोहोचल्या आहेत. जीवनात सगळ्यांचा साथ सुटला, पण सोबत होती ती फक्त दैवी देणगीची म्हणजेच त्यांच्या आवाजाची, त्यांचा मधूर गळ्याची. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रात्रीत यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या रानू मंडल गायक हिमेश रेशमिया नंतर आता 'इंडियन आयडॉल' शोचा विजेता सलमान अली सोबत गाताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द सलमानने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला. 


त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या सध्या घेत आहेत.