मुंबई : कधी कोणाच्या जीवनात काय होईल हे सांगता येणार नाही. असचं काही झालं आहे रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या सोबत. राहण्यासाठी घर नव्हतं आणि पोट भरण्यासाठी पैसे नव्हते साथ होती ती फक्त गोड आवाजाची. रेल्वे स्टेशनवर प्रवासी देखील त्यांचा आवाज ऐकण्यासाठी उभे राहत असंत. त्यानंतर त्यांना काही दिल्याशिवाय ते सुद्धा पुढे जायचे नाही. आजच्या काळात सोशल मीडिया अगदी प्रभावशाली माध्यम मानलं जात. याच प्रभावशाली माध्यमातून त्यांच्या आवाजाला ओळख मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे स्टेशनवर आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी एक सामान्य महिला आता गायक हिमेश रेशमियाच्या मदतीने चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्यासाठी सज्ज झाली आहे. रानू मंडल लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या 'सुपरस्टार सिंगर'मध्ये उपस्थित राहणार आहे. 


या कार्यक्रमादरम्यान निवेदक जय भानुशालीने जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनवर गाणं का गाता? असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, 'मी रेल्वे स्टेशनवर गाणं गात होती, कारण माझ्याकडे राहण्यासाठी घर आणि पोट भरण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा कोणी बिस्किटं देवून जात असत, तर कोणी पैसे.' अशी मन हेलावून टाकणारी गोष्ट त्यांनी 'सुपरस्टार सिंगर'च्या मंचावर शेअर केली. 


रानू हिमेशच्या 'हॅपी हार्डी और हिर' या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायन करणार आहेत. या चित्रपटात त्या 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गाताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे खुद्द हिमेशने सुद्धा 'तेरी मेरी कहानी' गण्याला आवाज दिला आहे.