मुंबई : अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी '८३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. '८३' चित्रपट एका खऱ्या कथेवर साकारण्यात आला आहे. चित्रपटाचे काम अंतीम टप्प्यात होते. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक 'कट' म्हणाला आणि रणवीरच्या डोळ्यातून पाणी आले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


कबीरने सांगितले की, 'लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियममध्ये पाच दिवस चित्रपटाची शूटींग सुरू होती. अखेर ती वेळ आली ज्यावेळेस कपिल देव यांना विश्वचषक प्रदान करण्यात आलं. तसेच चित्र रणवीरसोबत शूट झाले आणि शेवटी त्याचे आश्रू अनावर झाले.'


हा चित्रपट समस्त भारतीयांना एका ऐतिहासिक क्षणाची आठवण करूण देणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटातून १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या यशोगाथेवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 


१० एप्रिल २०२० रोजी क्रिकेटमधील सुवर्ण अध्यायाला झळाळी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही चित्रपटातून झळकणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे.