मुंबई : अभिनेता रणवीर सिंगचा 32वा वाढदिवस आहे. रणवीरने त्याच्या वाढदिवशी स्वतःला एक कार घेतली. या नव्या कारने रणवीर मुंबईच्या वरळी भागात त्याची  गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणच्या घरी पोहोचला. त्यानंतर तो दीपिकाला घेवून ताज हॉटेलला गेला. रणवीर आणि दीपिका तेथे एकत्र जेवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगने एस्टन मार्टिन कंपनीची कार घेतली ज्याची किंमत 3.8 कोटी आहे. रणवीर जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन निघाला तेव्हा मीडियाने त्यांना घेरलं. दोघांनी मीडियाला पोज देखील दिल्या.


रणवीर पांढरा टीशर्ट आणि टोपी घालून ड्राइविंग सीटवर दिसत आहे. तर दीपिका ब्लॅक ड्रेसवर रणवीरच्या बाजुला दिसते आहे.