मुंबई : बॉलिवूडमध्ये खूप कमी असे कपल आहेत ज्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमेस्ट्री अतिशय शानदार आहे. या प्रकरणात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)  यांचं नाव अग्रस्थानी आहे. कारण चाहते या दोघांना जेवढे पडद्यावर पसंत करतात तेवढेच खऱ्या आयुष्यातही पसंत करतात. कायम चर्चेत असलेली ही जोडी कायम अनेकांना कपल गोल्स देत असते. आता देखील एका नव्या कारणासाठी दीपिका आणि रणवीर चर्चेत आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि दीपिकाने अभिनेता शाहरुख खानच्या शेजारी घर घेतलं आहे. सागर रेशम रेसिडेंशिअलमध्ये हे अपार्टमेंट आहे. दीपवीरच्या नव्या घराची किंमत ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. 



दीपवीरने या अलिशान अपार्टमेंटसाठी सुमारे 119 कोटी रुपये मोजल्याचे म्हटले जात आहे. रणवीरचे हे घर देशातील महागड्या घरांपैकी एक आहे. नवीन घर घेतल्यामुळे दीपिका आणि रणवीर चर्चेत आहेत. 


रणवीरचे  घर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्या जवळ आहे. 11 हजार 266 चौरस फूटात असलेलं हे अपार्टमेंट चार मजल्यांचं आहे. 


16 व्या, 17 व्या, 18 व्या आणि 19 व्या माळ्यावरच्या या घरासाठी रणवीरला 18 पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला 7 कोटी 13 लाख रुपये स्टांप ड्यूटी भरली आहे.