मुंबई : बॉलिवूडचा हटके अभिनेता रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने पत्नी दिपिकाने अतिशय अनोख्या पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकाने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि रणवीरला लागलं शहनाजचं वेड
दीपिका पादुकोणने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दोघंही नाचताना दिसत आहेत. शहनाज गिलच्या प्रसिद्ध डायलॉगमधून तयार करण्यात आलेल्या रॅपवर हा डान्स दोघांनी केला आहे. या व्हिडिओत दोघंही बरीच मस्ती करताना दिसत आहेत.


सर्वात आवडती व्यक्ती नवरा 
या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग पाढंऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर, दीपिका पादुकोणने हिरव्या रंगाचे अ‍ॅथलिझर परिधान केलं आहे. गाण्यात दोघांचं बॉन्डिंग अप्रतिम दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना दीपिकाने लिहिलं की, "कारण आज तुमचा वाढदिवस आहे, म्हणून मी आता शांत राहतेय की तुझा कुत्रा टॉमी आणि माझा कुत्रा कुत्रा माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." अशा आशयाचं कॅप्शन देत दिपिकाने व्हिडिओ पोस्ट केला आहे


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणवीरच्या वाढदिवशी चित्रपटाची घोषणा 
रणवीर सिंगच्या वाढदिवशी करण जोहरनेही नवीन चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात आलिया भट्ट रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. ''रॉकी और रानी की प्रेम कहानी'' असं या चित्रपटाचं नाव आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीसुद्धा एकत्र दिसणार आहेत.