मुंबई : कालच चित्रपट दिग्दर्शक शंकर यांनी बॉलिवूड एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी 'अन्नियन' चित्रपटाचा हिंदी रिमेक जाहीर केलाय. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असल्यांच जाहीर केलं होतं. मात्र हा चित्रपट तयार होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या सिनेमाचे मूळ निर्माते विश्वनाथन रविचंद्रन यांनी 2005 च्या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं होतं. आता  विश्वनाथन रविचंद्रन यांनी शंकर यांना नोटीस पाठविली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्ही. रविचंद्रन यांनी त्यांना प्रश्न विचारला आहे की, रणवीर सिंग यांच्यासोबत 'अन्नियन' चित्रपटाचा रिमेक तो कोणत्या आधारावर तयार करत आहे, यासाठी तुम्ही आधी माझी परवानगी घ्यायला हवी होती. हिंदी रिमेकची बातमी ऐकताच तो स्तब्ध झाल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.यामुळे निर्माते व्ही. रविचंद्रन यांनी शंकर हे बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. रविचंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, निर्माता म्हणून 'अन्नियन'च्या कथेचे सर्व हक्क माझ्याच्याकडे आहेत. आता या चित्रपटामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे.



हिंदी रीमेकची बातमी ऐकुन बसला धक्का
विक्रम, प्रकाश राज स्‍टारर 'अन्नियन'च्या प्रड्यूसरने सांगितल, 'मला अन्नियन हिंदी रीमेकची बातमी ऐकुन बसला धक्का आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या सिनेमाचा निर्माता मी आहे आणि 'अन्नियन'च्या कथेचे सर्व हक्क माझ्याकडे आहेत. माझ्या परवानगीशिवाय या कथेवर आधारित चित्रपट बनवणं अथवा कथेची कॉपी करणं हे सगळं बेकायदेशीर आहे. मला हे वाचून धक्का बसला की 'अन्नियन'च्या कथेवर आधारित हिंदी चित्रपट तुम्ही करत आहात. तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहित आहे की 'अन्नियन'चा निर्माता मी आहे.''


रविचंद्रन यांनी शंकर यांना तात्काळ या चित्रपटासंदर्भातलं काम थांबवण्यास सांगितलं आहे.
कालच शंकर यांनी ही घोषणा केली होती की, 'अन्नियन', जो 'अपरिचित' या नावाने हिंदीमध्ये डब झाला होता आणि त्याला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादही मिळाला होता, त्या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे.