पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड
बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत.
मुंबई : बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत.
दीपिकाला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. चित्रपटाचा विरोध इतका झाला की पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. पण दीपिकाला धमकी मिळण्याचं सत्र अजून सुरुच आहे.
अलीकडे दीपिका एका अवॉर्ड शोमध्ये गेली होती. पण इतर कलाकारांसारखं रेड कार्पेटवर तिला पोस देणं शक्य झालं नाही. सुरक्षेच्या कारणास्तव तिने ते टाळलं आणि सुरक्षेमध्ये सरळ ती आत निघून गेली. यानंतर दीपिका पूर्ण सुरक्षेसह, रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटाची दिग्दर्शक जोया अख्तरच्या घरी पोहचली.
दीपिकाच्या आधी रणवीर सिंगही इथे पोहोचला होता. दीपिका जेव्हा जोया अख्तरच्या घरातून बाहेर पडली, तर रणवीर सिंग देखील सेक्युरीटीसोबत दीपिकाला सोडण्यासाठी कारपर्यंत आला.
रणवीर सिंगने दीपिकाला गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं. त्यानंतर तो गेला. रणवीर सिंग दीपिकाला मिळणाऱ्या धमक्यांमुळे खूप टेन्शनमध्ये दिसतोय. तो दीपिकाच्या संरक्षणाचा सतत आढावा घेत असतो.