मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कपड्यांच्या बाबतीत जसे प्रयोग करतो तसेच तो त्याच्या लूकसोबतही खेळत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजीरावच्या भूमिकेसाठी रणवीरने पिळदार मिशी ठेवली होती. आता 'पद्मावती' सिनेमात अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेसाठी त्याने गेले काही महिने दाढीही सांभाळली. पण नुकत्याच पार पडलेल्या 'जीक्यू' अवॉर्ड फंक्शनमध्ये मात्र रणवीर क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला.  


रणवीर सिंग 'पद्नावती'मध्ये करत असलेल्या अल्लाउद्दीज खल्जीच्या तरूणपणाच्या भूमिकेसाठी असा बदल केल्याचे स्पष्ट केले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'पद्मावती'ची झलक रसिकांसमोर आली. राणी पद्मावती साकारणारी दीपिका पहिल्यांदाच 'युनिब्रो'( जोडलेल्या भुवयांच्या ) लूकमध्ये दिसणार आहे. 


रणवीर सिंग, दीपिका पादूकोण सोबत शाहीद कपूर या चित्रपटामध्ये झळकणार आहे. संजय लीला भंन्साळींचा हा ड्रीम  प्रोजेक्ट १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.