Ranveer singh Maldives Controversy : सध्या सोशल मीडियावर मालदीव वाद सुरु आहे. अनेक लोक हे मालदीवला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप कॅन्सल केली. या सगळ्यात बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला देत आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडून एक चूक झाली आहे. त्यानं लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला देत मालदीवचे फोटो शेअर केले. त्याच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तर रणवीरनं ती पोस्ट देखील डिलीट केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात अनेक अपमानजनक गोष्टी केल्या. अनेकांनी अपमानकारक पोस्ट शेअर केल्या. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आता त्यांच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशनला न जाण्याचा सल्ला त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. त्यांनी भारत आणि आपल्या देशाच्या संस्कृतीवर ट्वीट केलं. तर रणवीरनं देखील असंच केलं. रणवीर काही फोटो शेअर करत म्हणाला की यंदाच्या वर्षी आपली संस्कृती आणि आपल्या देशाविषयी अनेक गोष्टी जाणून घेऊया. आपल्या देशात असलेल्या अनेक गोष्टी या पाहण्यासारख्या आहेत आणि त्याशिवाय आपल्याइथे खूप सुंदर बीच आहेत. पण हे सगळं बोलताना रणवीरकडून एक चूक झाली आणि त्यानं मालदीवचे फोटो शेअर केले. 



रणवीरची चूक काही नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रिनशॉट काढलं आणि लिहिलं की रणवीर जे सुंदर बीच दाखवतोय ते मालदीवचं आहे. रणवीरला जेव्हा त्याची चूक लक्षात आली तेव्हा त्यानं हे फोटो डिलीट केले आणि फक्त पोस्ट शेअर केली. 



रणवीरला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं हा स्क्रिनशॉट शेअर केला आणि कॅप्शन दिलं की 'रणवीर सिंग मालदीवचा फोटो शेअर करत लक्षद्वीपला प्रमोट करतोय. आता पोस्ट डिलीट केली. मोये-मोए.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लक्षद्वीपला प्रमोट करण्यासाठी रणवीर सिंगनं वापरलं मालदीवचे फोटो. चूक करताच डिलीट केली पोस्ट.' 


हेही वाचा : VIDEO : 'लग्न केलंय, नोकर नाही...'; अंकितासमोर विकीचं मोठं वक्तव्य...


फक्त रणवीर सिंग नाही तर त्याच्या आधी अक्षय कुमार, वरुण धवन, सलमान खान आणि श्रद्धा कपूर या कलाकारांनी पोस्ट शेअर करत लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला. तर त्यांच्याशिवाय सचिन तेंडुलकर, वेंकटेश प्रसाद आणि विरेंद्र सेहवारनं देखील मालदीवला जाण्या ऐवजी भारत फिरण्याची विनंती केली आहे.