Vicky Jain and Ankita Lokhande fight : 'बिग बॉस 17' सुरु झाल्यापासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. यात लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी कौशलसोबत दिसते. खरंतर, सध्या एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंकिता म्हणते की 'आज अचानक मन्नारा आयुष्यात आली. तुला खूप आवडते ना ती. तुला तिच्यासोबत बोलायला खूप आवडतं, अशा अनेक गोष्टी अंकिता तिच्या नवऱ्याला बोलते. त्यानंतर तिच्यात आणि विकीमध्ये वाद होतो.
सध्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत अंकिता विकीला बोलताना दिसते की 'आज अचानक मन्नारा आयुष्यात आली. तुला खूप आवडते ना ती. तुला तिच्यासोबत बोलायला खूप आवडतं.' त्यावर विकी बोलतो की त्यात चुकीचं काय आहे? त्यात काही लॉजिक सांग. काही कारण सांग.' तर अंकिता चिडते आणि बोलते तुला काय प्रॉब्लम आहे? तुझ्याकडे मन्नारा बद्दल बोलते तर तुला वाईट वाटतंय? यावर विकी बोलतो तुझ्या या विचारांनीच सगळ्या मित्रांना अशा प्रकारेच लांब करते.
Tomorrow's Episode Promo: Pati Patni Fight - Vicky Vs Ankita bcz of Mannara #BiggBoss17 pic.twitter.com/oP6o1AF3m6
— #BiggBoss_Tak(@BiggBoss_Tak) January 7, 2024
अंकिता हे ऐकताच बोलते 'तुझी मैत्रीन असल्याचं म्हणते ना... जा तुझी मैत्री सांभाळ.' त्यावर विकी बोलतो 'मला जिथे जायचंय तिथे जाईन.' पुढे अंकिता गार्डन एरियातून किचन एरियात जाते आणि बोलते, 'हे जे आहे ना ते फेकून मारेन.' विकी लगेच अंकिताला टोमने मारू लागतो आणि बोलतो 'यासाठी चांगलं शिकवायला हवं होतं.' त्यावर अंकिता बोलते 'जा शोध शिकलेली मुलगी. मी पण जर विचार करून निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती.' विकी चिडून बोलतो, तू कोणते निर्णय विचार करून घेतले आहेस?
विकीनं केलेलं वक्तव्य ऐकतास अंकिता आणखी चिडते आणि ती बेडरूममध्ये जाऊन रडू लागते. अंकिता बोलते 'माझ्यावर असलेलं तुझं प्रेम संपलं आहे. मला आता हे जाणवू लागलं आहे विकी.' तर विकी बोलतो 'लग्न केलं आहे, तुझा नौकर नाही आहे मी.'
हेही वाचा : श्रीराम मांसाहार करण्याच्या डायलॉगमुळे नयनताराच्या 'अन्नपूर्णानी' चित्रपटाविरोधात तक्रार
हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अंकिताला ट्रोल करत आहेत. अंकिता उगाच मन्नारावर जळते. एका नेटकऱ्यानं म्हटलं की मन्नारा, विकीला भाऊ बोलते. त्यावरून अंकितानं का जळावं. हे थोडं अती होतंय. दुसरा नेटकरी म्हणाला, मन्नारानं अंकिताला स्पष्ट सांगितलं आहे की तुझं नातं तुझ्यापर्यंतच राहणार आहे तरी ही अशी का करतेय. तिसरा नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय की अंकिताला माहितीये मन्नारा नाही विकी ठरकी आहे.'