मुंबई : बॉलिवूड स्टार रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. अलीकडेच करण जोहरच्या शोमध्ये साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभूने स्वतःला रणवीर सिंगचा चाहता असल्याचं सांगितलं आहे. आता यावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, अलीकडेच रणवीर सिंगने त्याच्या एका मुलाखतीत सामंथाबद्दल एक वक्तव्य करत सांगितलं होतं की, ''त्याने अभिनेत्रीसोबत  जाहिरात शूट केली आहे.  आशा आहे की भविष्यात आम्हाला पडद्यावर आणखी काही प्रोजेक्ट करायला मिळतील. कारण मला वाटतं. ती एक अद्भुत व्यक्ती आहे. ती एक सुंदर ऊर्जा असलेली सकारात्मक कलाकार आहे. तो एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती आहे.


रणवीरने खुलासा केला की, आम्ही एकत्र एक अ‍ॅड शूट केली होती. तिथेच आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि आमची चर्चा सुरू झाली. त्याच दिवशी ती मला म्हणाली, 'अरे, मी उद्या 'कॉफी विथ करण'चं शूटिंग करतेय. शो दरम्यान करण जोहरने अभिनेत्रीला विचारलं होतं की, तिला तिच्या मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी कोणत्या बॉलिवूड स्टारला बोलवायला आवडेल?
 
या प्रश्नाला उत्तर देताना समंथा म्हणाली की, तिला बॉलिवूड स्टार रणवीर सिंगला बोलावायला आवडेल. एवढंच नाही तर अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, ती रणवीर सिंगची खूप मोठी फॅन आहे. आता रणवीर सिंगचं उत्तर चाहत्यांची मनं जिंकत आहे.


स्टार्सच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सामंथा विजय देवरकोंडासोबत 'कुशी' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सामंथा 'शंकुतलम' चित्रपटातही दिसणार आहे. यापूर्वी अशीही बातमी आली होती की ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर रणवीर सिंग 'रॉकी और रानीची प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसोबत दिसणार आहे.