Ranveer singh and Vijay devarakonda: कलाकार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत तर राहतातच त्यातून आता त्यांची अधिक चर्चा होते ती त्यांच्या विचित्र वागणूकीमुळे. त्यातून आता दरवेळेला अशा काही गोष्टींना कारणीभूत ठरला आहे तो म्हणजे रणवीर सिंग.. रणवीर सिंगची आपल्या अभिनयापेक्षा त्याच्या विक्षिप्त फॅशन आणि वागणूकीमुळे ओळखला जातो.  नुकताच तो लायगरच्या ट्रेलर लॉन्चला आला होता तेव्हा त्याने पुन्हा एकदा कहर माजवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या अभिनयशैलीसाठी रणवीर सिंग फेमस आहेच पण त्याहीपेक्षा तो आपल्या विचित्र वागणूकीमुळे वादात राहतो. अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी रणवीर सिंग हैद्राबादमध्ये पोहोचला होता तेव्हा त्याच्या अशा एका वागणूकीमुळेच तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 


लायगर हा सिनेमा भारतभर प्रदर्शित होणार आहे तेव्हा याच चित्रपटाच्या तेलुगूच्या ट्रेलरसाठी सगळी बॉलीवूड मांदियाळी तिथे हजर होती. यावेळी रणवीर, अनन्या आणि विजय चित्रपटातीलचत एका गाण्यावर ताल धरला होता. 


रणवीर, अनन्या आणि विजय हे तिघंही सिनेमाच्या गाण्यावर ताल धरत होते आणि त्याचवेळेला विजय अनन्यासोबत डान्स करताना तिला किस करतो. तेव्हा रणवीर थोडा लांब होता पण हे पाहून लहान बाळाप्रमाणे रणवीर चिडून निघून गेला. त्यातून तो तर सरळ स्टेज सोडूनच पळून गेला. हे पाहून बिचारी अनन्याही त्याला विनवण्यासाठी त्याच्या मागे मागे गेली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लायगर हा चित्रपट करण जोहरने प्रोड्यूस केला आहे आणि लवकरच तो पॅन इंडिया प्रदर्शित होतो आहे.