मुंबई : बॉक्स ऑफिसवर आपण 'सिंघम' असल्याचं दाखवून देत 'सिम्बा' बनलेल्या रणवीर सिंहनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पण, रणवीर सिंह सध्या एका गोष्टीनं सध्या हैराण केलंय. नुकतंच एका मुलाखतीत ही गोष्ट रणवीरनं उघड केलीय. रणवीर सध्या दु:खी आहे त्याच्याबद्दल उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे... रणबीरच्या बॉलिवूड डेब्युसाठी त्याच्या वडिलांनी १० लाख रुपये दिल्याची अफवा सध्या चर्चेत आहे. आपल्याबद्दल असं काही ऐकून आपण हैराण झाल्याचं रणवीरनं म्हटलंय. अशी एखादी मोठी गोष्ट इतक्या सहजपणे कुणी कसं बोलू शकतं, असं म्हणत रणवीरनं आश्चर्य व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत रणवीरनं या गोष्टीचा खुलासा केलाय. आत्तापर्यंत कोणत्याही गॉसिप किंवा अफवेनं आपल्या करिअरवर कोणताही परिणाम झाला नाही, याबद्दल त्यानं निश्वास टाकलाय. परंतु सोबतच, कुणीतरी अशी अफवा पसरवली की रणवीर सिंहच्या वडिलांनी त्याच्या बॉलिवूड डेब्यूसाठी आदित्य चोपडा याला १० लाख रुपये देऊ केले होते... या अफवेनं आपल्याला हैराण केल्याचं रणवीरनं म्हटलंय.  


आज मी जिथे कुठे आहे तिथे पोहचण्यासाठी खूप स्ट्रागल केलाय. काही तरुण अभिनेते मला मॅसेज करून विचारत आहेत की आम्हीही पैसे उभे करू शकतो, आम्हाला काय करावं लागेल? आणि मला त्यांना समजावून सांगावं लागतंय की या सर्व अफवा आहेत त्याला खरं मानू नका, असं रणवीरनं म्हटलंय. 


रणवीरच्या करिअरबद्दल म्हणाल तर बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा' धुमाकूळ घालताना दिसतोय. या सिनेमानं भारतीय बाजारात केवळ तीन आठवड्यांत २३० कोटींचा आकडा पार केलाय. यासोबतच या सिनेमानं शाहरुख खान - दीपिकाच्या 'चेन्नई एक्सप्रेस'ला मागे टाकत आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. २०१० साली आलेल्या 'बॅन्ड बाजा बारात' या सिनेमातून रणवीरनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.