मुंबई : ‘पद्मावती’ सिनेमात अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंह चांगला खुश झाला आहे. संजय लीला भन्साली यांच्या या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियातून खूप प्रशंसा केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासोबतच सिनेमाची उत्सुकताही अधिक जास्त ताणली गेली आहे. या ट्रेलरची प्रशंसा करणा-या चाहत्यांचे रणवीरने ट्विटरवर आभार मानले आहे. 


रणवीरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या सिनेमाच्या ट्रेलरची प्रशंसा केलेल्या सर्वांचे खूप आभार. यासारखी प्रशंसा अद्भूत आणि दुर्लभ आहे. संजय सर खूप निपुण आहे. सिनेमाला फार कुशलतेने रचणारे आहेत. त्यांनी या सिनेमासाठी खूप काही सहन केलंय. आणि अनेक त्याग केलेत. या सिनेमाच्या ट्रेलरची सफलता त्यांच्या दृढ निश्चयाला पोचपावती आहे’.



रणवीरसोबतच दीपिकानेही प्रेक्षकांचे त्यांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी आभार मानले आहे. दीपिकाने ट्विटवर लिहिले की, ‘हा दिवस संपण्यावर आलाय. आज ज्याप्रकारचा आनंद अनुभवत आहे, त्यासाठी मी अजून आभार मानने सुरूही नाही केले. कधी कधी मी विचार करते की, इतकं प्रेम आणि प्रशंसा मिळवण्यासाठी मी असं काय केलंय. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते’.




येत्या १ डिसेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षकांची सिनेमा बघण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा ट्रेलरपासून सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दीपिका या सिनेमात राणी पद्मावती यांची तर शाहिद कपूर रावल रतन सिंह यांची भूमिका साकारत आहे.