दीपिका नव्हे तर रणवीरच्या आयुष्यात असती अनुष्का शर्मा ! `त्या` तरुणीमुळे प्रेमभंग
दीपिकाच्या आधी रणवीरच्या आयुष्यात अनुष्का शर्माला खास जागा, `त्या` तरुणीमुळे बिनसल
मुंबई : बॉलीवूडमधील अनेक लव्हस्टोरीज पूर्ण होऊ शकल्या नाहीत पण त्यांच्या गॉसिप्स खूप झाल्या. अशीच एक जोडी आहे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंगची. दोघांनी पहिल्यांदा 'बँड बाजा बारात' सिनेमात एकत्र काम केलं. रणवीर सिंगचा हा पहिलाच डेब्यू सिनेमा होता तर अनुष्काचा हा दुसरा सिनेमा होता.
या दोघांच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि हा सिनेमा देखील हिट झाला. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातही दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. काही काळ दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण नंतर 2011 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांच्या नात्यात दुरावा आला.
एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान रणवीरने सोनाक्षी सिन्हासोबत एक अभिनय केला, ज्यामुळे अनुष्का त्याच्यावर चिडली. दोघांचं सर्वांसमोर भांडण झालं आणि संपूर्ण कार्यक्रमात एकमेकांशी बोलले नाहीत. त्यानंतर दोघे कायमचे वेगळे झाले.
त्यावेळी अनुष्काला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळत होते तर दुसरीकडे रणवीर इंडस्ट्रीत स्थान निर्माण करत होता. या सर्व गोष्टींमुळे अखेर त्यांचे नाते तुटले.
एका मुलाखतीत रणवीर अनुष्कासोबतच्या ब्रेकअपवर म्हणाला होता की, मला तिची खूप आठवण येते. ती खूप प्रेमळ गोड आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. जेव्हा मी अनुष्काबद्दल नकारात्मक लेख वाचतो तेव्हा मला राग येतो, परंतु माझ्यावर लिहिलेल्या नकारात्मक लेखांचा मला इतका राग येत नाही. रणवीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनुष्काने विराट कोहलीसोबत तर रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले.