मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पती असण्याबरोबरच रणवीर सिंग दिपीकाचा चाहता आहे. तो स्वतः अनेकवेळा याबद्दल बोलला आहे. आता त्याने दीपिकाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे की, ते ऐकल्यानंतर प्रत्येकजण या जोडीचा चाहता होईल. कारण रणवीरवर विश्वास ठेवला तर त्याला होस्ट म्हणून परिपूर्ण बनण्यात दीपिकाचा हात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी केली मदत
रणवीर सिंगने होस्ट म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत केल्याचं श्रेय दीपिका पदुकोणला दिलं आहे. आणि ती त्याची सर्वात मोठी विश्वासू असल्याचं सांगितलं आणि त्याच्या कार्यावर सर्जनशीलपणे टीका केली. 'द बिग पिक्चर'च्या लॉन्च दरम्यान, रणवीरने खुलासा केला की, दीपिकाने त्याला शोचा भाग होण्यासाठी कशी मदत केली आहे.


दीपिका टिप्स देते
रणवीर म्हणाला, 'दीपिकाने मला होस्ट म्हणून अधिक चांगलं काम करण्यासाठी अनेक टिप्स दिल्या आहेत. ती नेहमीच माझी सर्वात मोठी विश्वासू राहिली आहे आणि माझ्यासाठी रचनात्मक आलोचन शेअर करते. तो पुढे म्हणाला, 'मी खरोखरच आभारी आहे की, माझ्या जोडीदाराकडे ईतकी तीक्ष्ण बुद्धी आहे. तिच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे, मी नक्कीच माझं सर्वोत्तम देऊ शकतो.


या चित्रपटांमध्ये दिसेल
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणवीर लवकरच कबीर खानच्या '83' मध्ये दिसणार आहे, जो 1983 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक क्रिकेट विजयावर आधारित आहे. रोहित शेट्टीचा कॉमेडी चित्रपट 'सर्कस' आणि अॅक्शन ड्रामा 'सूर्यवंशी' मध्येही दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित 'जयेशभाई जोरदार' साठीही तो उत्सुक आहे.