मुंबई : संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावती'चा ट्रेलर प्रदर्शित झाला... या सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असले तरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतल्या रणवीर सिंगनं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण ट्रेलरमध्ये रणवीरचा एकही डायलॉग पाहायला मिळत नाही... तरीदेखील रणवीरनं केवळ आपल्या बोलक्या अन् क्रूर नजरेतून या भूमिकेचे अनेक पैलू, अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या या लूकची, त्याच्या भूमिकेची आणि त्याच्या अभिनयाची वाह... वाह न झाली तरच नवल...


परंतु, रणवीरनं आपल्या या भूमिकेची उत्सुकता आता आणखीनच वाढवलीय. रणवीरनं नुकतंच सोशल मीडियावर एक स्केच शेअर केलंय. अलाउद्दीनच्या डोळ्यांचं हे स्केच आहे... ही उत्सुकता ताणून धरण्यासाठी रणवीरनं या फोटोला कोणतीही कॅप्शन दिलेली नाही.


त्याच्या या डोळ्यांत नेमकी कोणते भाव आहेत... ते चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या लक्षात येतीलच... पण, रणवीरच्या या 'खलनायकी' भूमिकेला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर उचलून धरतील... याचीच झलक या स्केचमधून पाहायला मिळतेय.