`इश्क में दिल...`; शाहरूखला दीपिकाने Kiss करताना पाहून पती रणवीरची लक्षवेधी कमेंट
Ranveer Singh Comment on Deepika and Shah Rukh Khan Kiss Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीपिका पादूकोण आणि शाहरूख खानची. त्यांच्या एका किसच्या फोटोवर रणवीर सिंगनं भन्नाट कमेंट केली आहे.
Ranveer Singh Comment on Deepika and Shah Rukh Khan Kiss Photo: दीपिका आणि शाहरूख खाननं यावेळी 'जवान' चित्रपटाच्या प्रेस कॉन्सफरन्सदरम्यान हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. आता अशातच त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर दीपिका ही चांगलीच व्हायरल होताना दिसते. ती इन्स्टाग्रामवर ती खूप सक्रियही आहे. त्यातून यावेळी तिनंही आपला आणि शाहरूख खानचा एक हटके फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
दीपिका ही अनेकदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना दिसते आणि मग त्यावर रणवीर सिंग हा नेहमीप्रमाणे क्यूट कमेंट करताना दिसतो. त्याच्या कमेंटची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर मग दीपिकाच्या फोटोवर रणवीरनं काय कमेंट केली याची जोरात चर्चा रंगताना दिसते. आता पुन्हा एकदा अशीच एक चर्चा रंगलेली दिसते आहे. चला तर मग पाहुया की यावेळी रणवीरनं कोणती कमेंट कुठल्या फोटोवर केली आहे?
हेही वाचा : ब्रेकअपनंतर संसारात रमले, आता 'या' कारणासाठी एकत्र येणार करीना-शाहीद!
सध्या शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटानं फारच कमी दिवसात विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट फार मोठी भरारी घेण्याची शक्यता आहे. शाहरूख खानचा यावर्षी जवान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचीही जोरात चर्चा ही रंगलेली होती. या चित्रपटानंही अगदी कमी दिवसात 1000 कोटींचा पल्ली गाठला होता. त्यातून आता जवान हा चित्रपटही फारच कमी कालावधीत मोठी कमाई करणार आहे. गेल्या सात-आठ दिवसांमध्ये जगभरात या चित्रपटानं 700 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दीपिका पादूकोण, शाहरूख खान, विजय सेतूपती, नयनतारा असे मोठमोठे स्टार्स या चित्रपटातून दिसले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळीच पर्वणी ठरला आहे. त्यातून अटली कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
यावेळी दीपिकानं तिचे काही सोलो आणि शाहरूखसोबतचा क्यूट फोटो शेअर केला आहे. शाहरूख खानसोबतच दीपिकानं आपला डेब्यू केला होता. 2007 साली आलेल्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून ते दोघं एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. त्यानंतर 'हॅप्पी न्यू इयर', 'चेन्नई एक्सप्रेस', 'पठाण' आणि आता 'जवान' अशा चित्रपटांतूनही शाहरूख खान आणि दीपिकाला रोमान्स करताना पाहिलं आहे. यावेळी आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, 'हे माझ्यासाठी शेवटचं आहे.' त्यावर रणवीरनं हार्ट इमोजी टाकत कमेंट केली आहे की, 'इश्क में दिल बना है इश्क में दिल फना है...' त्यांच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.