लग्नाच्या गडबडीतही रणवीरने `या` व्यक्तीचे आभार मानले
पाहा हा व्हिडिओ
मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दीपिका - रणवीरच्या लग्नाची. बंगलुरूतील रिसेप्शन आटपून हे नवं जोडपं मुंबईत दाखल झालं आहे. 14 - 15 नोव्हेंबर रोजी इटलीती लेक कोमोत विवाह संपन्न झाल्यानंतर दीपवीर अगदी व्यस्त आहेत. पण आपल्या या बिझी आणि फॅमिली टाइममधूनही रणवीरने एक खास गोष्ट शेअर केली आहे. रणवीर सिंहने एका दिग्दर्शकाचे मनापासून आभार मानले आहेत.
लग्नानंतर रणवीर सिंह 'सिंबा' या आगामी सिनेमाबाबत खूप उत्साही आहे. तसेच रणवीरचे चाहते देखील 'सिंबा'च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत असतानाच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
यासाठी 'सिंबा'मेकर्सने अनोखा फंडा वापरला आहे. रणवीर सिंहने आपल्या या लग्नाच्या गडबडीतही एक व्हिडिओ तयार केला आहे. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तो रोहित शेट्टीचे मनापासून आभार मानत आहे. आपण स्वतः दिग्दर्शक रोहित शेट्टीचे किती मोठे चाहते आहोत हे देखील या व्हिडिओत सांगितलं आङे.
या व्हिडिओतून असं कळतं की, सिनेमाचं शुटिंग संपल आहे. रणवीर सिंह हातात माईक घेऊन उभा आहे. तो सांगतो की, मला असं स्पीच देण्याची सवय नाही पण आज मला काही बोलायचं आहे. मी सर रोहित शेट्टी यांचा खूप मोठा चाहता आहे. मी कायम विचार करायचो की, किती छान होईल जर मी यांच्यासोबत काम केलं तर.... आणि आता ती संधी मला मिळाली.