मुंबई :  झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम त्यांच्या लूक आणि हटके अदांमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही प्रत्येक ठिकाणी वेग-वेगळ्या लूकमध्ये दिसणारे हे कलाकार कायम त्यांच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असतात. कायम कपड्यांमुळे ट्रोल होणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. पण न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांना सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटला अनेक दिवस उलटून गेले असले तरी सोशल मीडियावर सुरु असलेली ट्रोलिंग अद्यापही सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच रणवीरला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. रणवीरचा एअरपोर्टलूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचा साधा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर युजर्सने रणवीरच्या लूकवर अनेक कमेंट देखील केल्या आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका युजरने कमेंटमध्ये 'हा रणवीर सिंग नाही, कारण त्याचे कपडे फार साधे आहेत.' तर दुसरीकेड अन्य एक युजरने 'हा रणवीर सिंग आहे... यावर विश्वास बसत नाही...' अशी कमेंट केली आहे.



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रणबीर त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटनंतर अनेक सेलिब्रिटींचे न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं. पण अनेक दिवसांनंतरही रणवीर न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल होत आहे.