मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सर्वत्रच त्याच्या प्रेम आणि सकारात्मक एनर्जीसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर रणवीरचा नेहमीच काहीतरी हटके अंदाज पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा रणवीरने त्याच्या एका खास, आवडत्या व्यक्तीला, त्याच्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच रणवीरने एक फोटो शेअर केला आहे. रणवीरने त्याच्या बहिणीला, रितिका भवनानीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीरने बहिणीच्या वाढदिवशी तिचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. रणवीरने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळत आहे.



रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी यूकेमध्ये त्याचा ३४वा वाढदिवस साजरा केला. 



रणवीर सिंग आगामी '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. '८३' चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर, पहिल्यांदाच दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे. 



१० एप्रिल २०२० रोजी क्रिकेटमधील सुवर्ण अध्यायाला झळाळी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.