घोड्यावर नाही तर यावर बसून वरात घेऊन येणार रणवीर
रणवीरची ग्रँड वरात...
मुंबई : बॉलिवूडचे स्टार रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तयारी सध्या इटलीमध्ये सुरु आहे. 14-15 नोव्हेंबर रोजी लेक कोमो येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. दीपिका-रणवीर दोघेही आपल्या कुटुंबासोबत इटलीला पोहोचले असून लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.
लग्नामध्ये नवरदेव हा घोड्यावर वरात घेऊन येतो. पण रणवीर हा घोड्यावर नाही तर सी-प्लेनने वरात घेऊन येणार आहे. या सीप्लेनमध्ये 14 लोकं बसू शकतात. रणवीर हा त्याच्या कुटुंबियासोबत या सीप्लेनने वरात घेऊऩ येणार आहे. तर राहिलेले इतर पाहुणे हे लग्जरी यॉटमधून येणार आहेत. विवाहासोहळ्यात कलर कॉम्बिनेशनवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. पाहुण्यासाठी 2 यॉट बुक करण्यात आल्या आहेत.
दीपिका-रणवीर यांच्या मुंबईतील रिसेप्शन कार्ड देखील समोर आलं आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या मित्रांना आणि बॉलिवूडकरांना 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये रात्री 8 वाजता हा रिसेप्शन रंगणार आहे. ही रिेसेप्शन पार्टी रणवीर सिंहच्या आई-वडिलांनी ठेवली आहे. तर 21 नोव्हेंबरला दीपिका तिचं होमटाउन बंगळुरु येथे रिसेप्शन पार्टी देणार आहे. दीपिकाचे आई-वडील ही पार्टी होस्ट करतील.
काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तयारी सुरु असतानाचे फोटो समोर आले आहेत. लेक कोमो येथे जोरदार तयारी सुरु असून याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. इटलीतील लेक कोमो येथील विला डेल बेलवियानेलो येथे हा विवाह सिंधी आणि दक्षिण भारतीय पद्धतीने होणार आहे.