मुंबई : जेव्हापासून आलिया आणि रणबीरने आयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमासाठी एकत्र काम करायला सरुवात केली आहे तेव्हापासून या दोन्ही कलाकारांमध्ये जवळीकता अजूनच वाढली आहे. दोघेही अनेक स्पॉटवर सतत मीडियाच्या कॅमेरात कैद होत आहेत. मंगळवारी सोनम आणि आनंद आहुजाच्या लग्नालाही आलिया आणि रणबीर एकत्र दिसले. यातून पुन्हा एकदा यांच्या जवळीकतेची चर्चा सुरू झाली आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलिया आणि रणबीर स्वत:च्या नात्याबद्दल सांगत का नाहीत ? असा प्रश्नही विचारला जात आहे.



एकत्र डिनर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर त्या लंडनच्या मुलीला देखील भेटतो आहे जी त्याच्या आईने त्याच्यासाठी पसंत केली आहे. पण दूसरीकडे आलियासोबत रणबीरचं नाइट-आऊट सुरुच आहे. 3 मेच्या रात्री रणबीर आणि आलिया पुन्हा एकदा एकत्र दिसले. रणबीर आणि आलिया डिनर डेटवर एकत्र पाहिले गेले. दोघांसोबत करन जौहर आणि आरती शेट्टी देखील होती. पण रणबीर आणि आलिया येथे एकत्र आले होते आणि एकत्रच तेथून निघाले.



जोया अख्तरच्या पार्टीत


२५ एप्रिलला रात्री रणबीर आणि आलिया जोया अख़्तरच्य़ा पार्टीमध्ये भेटले होते. पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र तेथून निघाले. आलिया रणबीरला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या घरी देखील जाते. रणबीरला देखील आलियाच्या घरी येतांना अनेकदा पाहिलं गेलं आहे. आलियाचा रणबीरसोबतचं नातं घट्ट होत चाललं आहे. पण आलियाला ही गोष्ट माहित आहे की, रणबीर कपूर याआधी कॅटरीना कॅफ आणि दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांचा आता ब्रेकअप झाला आहे. पण रणबीर हा आलियाचा नेहमी  होता. दोघांमध्ये जवळीकता वाढल्याने बॉलिवूडमध्ये याची जोरदार चर्चा आहे.